प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा
1 मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे ........ होय.
2 द्यूत या खेळाचा उल्लेख या .......... भारतीय महाकाव्यात आढळून येतो.
3 ऑलिंपिक खेळाची सुरुवात ग्रीसमधील ......... या शहरातून झाली.
4 खासबाग मोतीबाग तालीम ...... ... येथे आहे.
5 एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहती असलेल्या मात्र स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रांसाठी ........ ही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते.
6 आशिया खंडातील राष्ट्रं करिता आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ........ या नावाने ओळखल्या जातात.
7 विसाव्या आणि एकविसाव्या शतकात खेळांचे .......... झाले आहे.
8 मनीषा बाठे यांच्या संशोधनानुसार मल्लखांब आणि त्यातील पकडीची निर्मिती ........ यांची आहे.
9 भारताचा राष्ट्रीय खेळ ........ आहे.
10 प्रस्तरारोहण हा ........... क्रीडा प्रकार समजला जातो.
11 मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन (29 ऑगस्ट) हा दिवस भारतात .......... म्हणून साजरा केला जातो.
12 कवी सुद्रका च्या ......... या नाटकाच्या नावाचा अर्थ मातीची गाडी असा होतो.
प्र 2 कारणे लिहा.
1 खेळांचा इतिहास माणसांएवढा जुना आहे.
2 ऑलिंपिक खेळाचे श्रेय ग्रीकांना दिले जाते.
3 विसाव्या आणि एकविसाव्या शतकात खेळाचे अंतरराष्ट्रीय करण घडून आले.
4 सध्या खेळातील अर्थकारण बदलले आहे.
प्र 3 सविस्तर उत्तरे लिहा.
1 मानवी जीवनातील खेळाचे महत्व स्पष्ट करा.
2 खेळाचे विविध प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा.
3 तुम्हाला माहिती असलेल्या कोणत्याही चार आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची माहिती थोडक्यात लिहा.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment