आंबे-दिंडोरी एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कुल, आंबे दिंडोरी येथील गणित अध्यापक श्री घायतड सर दिनांक 30 नोव्हेंबर, 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांच्या कार्याने अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळाली. त्यांचा सेवा काळ हा शिक्षणक्षेत्रातील कर्मयोग मानला जाईल यात शंका नाही. सरांचे प्राथमिक शिक्षण येवला तालुक्यातील नागडे या गावी झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवला; तर उच्च माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय येवला येथून पूर्ण केले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील विज्ञान महाविद्यालय येथून त्यांनी बी एस्सी (गणित) ही पदवी पूर्ण केली. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. गणित अध्यापक म्हणून त्यांनी शांतारामबापू वावरे यांच्या संस्थेत लाखलगाव येथे (अप्रशिक्षित अध्यापक) सेवा सुरू केली. त्यानंतर हिरे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मालेगाव येथून शिक्षणशास्त्र पदवी (बी एड) पूर्ण केले आणि 26 नोव्हेंबर 1990 पासून न्यू इंग्लिश स्कुल, आंबे-दिंडोरी येथे समर्पित वृत्तीने सेवा बजावली. ग्रामिण भागात शैक्षणिक सुविधांची वाणवा असता...