विश्व पर्यावरण दिनाचा इतिहास आणि महत्व दरवर्षी आपण वैयक्तिक आणि सामूहिक रीतीने वैश्विक पर्यावरण दिन (5 जून) साजरा करतो. याची सुरुवात कधी आणि कशी झाली या विषयी चा इतिहास जाणून घेऊया संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांपैकी स्वीडन या सदस्य राष्ट्राने आमसभेत सन 1968 मध्ये मानवी पर्यावरण परिषद आयोजित करण्याची मागणी केली होती सन 1969 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी यांच्या मागणीवर सहमती दर्शविली त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरात दिनांक 5 जून ते 16 जून 1972 या कालावधीत पहिली जागतिक मानवी पर्यावरण परिषद संपन्न झाली कॅनडातील राजकीय मुत्सद्दी उद्योजक आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे पहिले कार्यकारी संचालक मॉरिस स्ट्रॉंग यांच्या नेतृत्वाखाली स्टॉकहोम पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती. मॉरिस स्ट्रॉंग, कॅनडा स्टॉकहोम स्वीडन मधील पहिल्या जागतिक मानवी पर्यावरण परिषदेची सुरुवात पाच जून रोजी झाली होती या परिषदेत ढासळत्या पर्यावरणाच्या मानवी जीवनाव...