Skip to main content

विश्व पर्यावरण दिनाचा इतिहास आणि महत्व

    विश्व पर्यावरण दिनाचा इतिहास आणि महत्व


दरवर्षी आपण वैयक्तिक आणि सामूहिक रीतीने वैश्विक पर्यावरण दिन (5 जून) साजरा करतो.
याची सुरुवात कधी आणि कशी झाली या विषयी चा इतिहास जाणून घेऊया संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांपैकी स्वीडन या सदस्य राष्ट्राने आमसभेत सन 1968 मध्ये मानवी पर्यावरण परिषद आयोजित करण्याची मागणी केली होती सन 1969 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी यांच्या मागणीवर सहमती दर्शविली त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे 1972 मध्ये स्वीडनमधील स्टॉकहोम या शहरात दिनांक 5 जून ते 16 जून 1972 या कालावधीत पहिली जागतिक मानवी पर्यावरण परिषद संपन्न झाली कॅनडातील राजकीय मुत्सद्दी उद्योजक आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे पहिले कार्यकारी संचालक मॉरिस स्ट्रॉंग यांच्या नेतृत्वाखाली स्टॉकहोम पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली होती.
                  मॉरिस स्ट्रॉंग, कॅनडा

स्टॉकहोम स्वीडन मधील पहिल्या जागतिक मानवी पर्यावरण परिषदेची सुरुवात पाच जून रोजी झाली होती या परिषदेत ढासळत्या पर्यावरणाच्या मानवी जीवनावरील परिणामांवर चर्चा करण्यात आली तसेच जागतिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी कृती आराखडा ठरविण्यात आला.
याची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्र यांच्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) द्वारे 5 जून हा दिवस जागतिक विश्व पर्यावरण दिन म्हणून निश्चित करण्यात आला. सन 1974 मध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन अमेरिकेतील स्पोकेन शहरात साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून दरवर्षी 5 जून हा दिवस विश्व पर्यावरण दिन (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांपैकी एकास या विश्व पर्यावरण दिनाचे यजमानपद दिले जाते. तसेच दरवर्षी विश्व पर्यावरण दिनाचा आशय (theme) जाहीर केला जातो.
भारताला सन 2011 मध्ये पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या (UNEP) या सलग्न संस्थेद्वारे विश्व पर्यावरण दिनाचे यजमानपद देण्यात आले होते त्या वर्षीचा आशय होता - 'Forests - Nature at your Service'. त्यानंतर सन 2018 मध्ये भारतास दुसऱ्यांदा विश्व पर्यावरण दिनाचे यजमानपद मिळाले सन 2018 मधील आशय (theme) होता - 'Beat the Plastic Pollution'.
संयुक्त राष्ट्रांनी Agenda 2030 नुसार 17 शाश्वत ध्येये (Sustainable Goals) निश्चित आणि अनिवार्य केलेली आहेत. यापैकी खालील शाश्वत विकास ध्येये (SDGs)पर्यावरणाशी थेट संबंधित आहेत -

1) दारिद्र्य निर्मूलन (No Poverty)

2) भूक निर्मूलन (Zero Hunger)

6) स्वच्छ पाणी आणि आरोग्य    व्यवस्था (Clean Water and Sanitation)

7) परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा (Affordable and Clean Energy)

12) जबाबदारीने उपभोग वापर आणि उत्पादन (Responsible Consumption and Production)

13) हवामान विषयक कृती (Climate Action)

14) जल जीवसृष्टी (Life below Water)

15) भू जीवसृष्टी (Life on Land)

17) ध्येयप्राप्तीसाठी ची भागीदारी (Partnerships for Goals)

संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) या संस्थेद्वारे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या सर्व सदस्य राष्ट्रांना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अंतर्गत निश्चित केलेली 17 शाश्वत विकास ध्येये (17 Sustainable Development Goals - SDGs) संपादन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यासाठी सन 2030 ही कालमर्यादा घालून देण्यात आलेली आहे.

                    श्री अभय कुमार, भारत
           (विश्व पर्यावरण दिन गीत लिहिणारे कवी)

भारतीय राजनैतिक अधिकारी आणि कवी अभय कुमार यांनी शब्दबद्ध केलेले गीत सन 2013 मध्ये विश्व पर्यावरण दिन गीत (WED Anthem) म्हणून स्वीकृत केलेले आहे.

An Earth anthem penned by Abhay Kumar to celebrate World Environment Day (WED)

Our cosmic Oasis cosmic pearl

The most beautiful planet in the universe

All the continents and all the oceans

United we stand as flora and fauna

United we stand a species of one Earth

Different cultures beliefs and ways

We are humans, the earth is our home

All the people and the nations of the world

All for one and one for all

United we unfirl the blue marble flag
       - Abhay Kumar
         Indian Diplomat and
         Poet
हा आपल्या राष्ट्राचा बहुमान आहे.

सन 2022 म्हणजे चालू वर्षीचा विश्व पर्यावरण दिन महत्त्वपूर्ण आहे. सन 1972 मध्ये स्टॉकहोम (स्वीडन) मध्ये झालेल्या मानवी पर्यावरण परिषदेला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि या वर्षीचे यजमानपद देखील स्वीडनला देण्यात आलेले आहे. या वर्षीच्या विश्व पर्यावरण दिनाचा आशय आहे -  Only One Earth. या आशयाद्वारे संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने आवाहन केले आहे की  -
'जगातील सर्व लोकांनी शाश्वतपणे आणि निसर्गाशी सौहार्दपूर्ण राहून अधिक स्वच्छ आणि हरित पर्यावरणपूरक जीवनपद्धतीचा अंगिकार करावा. आपल्या आवडी-निवडी, ध्येय धोरणे आखताना पृथ्वीच्या रक्षणाचा प्राधान्याने विचार करावा.'

 आपण काय करू शकतो?
आपली पृथ्वी जगातील सर्व खंडांमधील लोकांचे घर आहे. संत ज्ञानेश्वरांनी ही संकल्पना पसायदानातून 12 व्या शतकात मांडली होती. 'आता विश्वात्मके देवे ...'
 तर संत तुकारामांनी देखील अधोरेखित केले होते - 'हे विश्वचि माझे घर...' आणि म्हणून आपल्या वैश्विक निवासाचे - पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी खालील कृती करू शकतो -

 1) स्वतःपासून सुरुवात करून घरात आणि कामाच्या ठिकाणी गरजेपुरतीच वीज वापरणे. घरातून वर्गातून कार्यालयातून बाहेर पडताना पंखे दिवे इत्यादी आवर्जून बंद करणे.

2)  कापडी पिशवीचा वापर करणे इतरांना आग्रह करणे.

3)  पाण्याचा काटकसरीने वापर करणे.
4)  सार्वजनिक ठिकाणी स्वयंशिस्तीने स्वच्छता राखणे.

5)  जवळच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी सायकलचा वापर करणे.

6)  आपल्या घरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन  (वर्गीकरण) करून घंटागाडीत देणे.

7)  निर्माल्य नदीकाठी नदीमध्ये न टाकता अन्य कोणत्याही जलस्रोतामध्ये न टाकता ते स्वतंत्रपणे घंटागाडी देणे.

8) आपापल्या परिसरात प्रत्येकाने किमान एक, कमाल पाच झाडे किंवा रोपे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी दत्तक घेणे आणि पुढील किमान पाच वर्षे यांची संपूर्ण देखभाल करणे.

9)  आपल्या जवळच्या परिसरातील देवराई, वनराई, वने यांना भेट देऊन तेथील जैवविविधतेचा अभ्यास करणे, संवर्धनासाठी कटिबध्द असणे.

10)  पर्यावरणाची हानी करणाऱ्या घटकांना संघटितपणे संविधानिक मार्गाने विरोध करणे व या संदर्भात जनजागृती करणे.
याप्रमाणे स्वतःशी प्रामाणिक राहून कोणत्याही अपेक्षेविना, निस्पृहपणे आपण पर्यावरणपूरक वागल्यास आपणास मिळणारा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.

पर्यावरण रक्षणा बद्दल काम कमी अन् माध्यम प्रसिद्धी अधिक अशी नौटंकी करणारे असंख्य लोक आपल्याला अनुभवायला मिळतात. आपण मात्र पृथ्वीशी विश्व - मातेशी प्रामाणिक राहून निरलसपणे हे कार्य करू या.
 5 जून - विश्व पर्यावरण दिनाच्या  पर्यावरणपूरक कार्यासाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!
 - पुरुषोत्तम ठोके
   उपशिक्षक
   नवरचना माध्यमिक विद्यालय 
   नाशिक
   9822582419

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Mary Kom - Comprehension

इ 10 वी राज्यशास्त्र भारतीय संविधानाची वाटचाल गृहपाठ

1  रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण          करा. 1  भारताच्या संविधानाने  ............... निर्माण            करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. 2  भारतात संविधानानुसार राज्यकारभार                    करण्यास ........... पासून सुरुवात करण्यात            आली आहे. 3  भारतीय मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे                इथपर्यंत खाली आणल्यामुळे भारतीय युवा              वर्गाला ............... प्राप्त झाले आहे. 4  सत्तेचे विकेंद्रीकरण हा ........... चा गाभा आहे. 5  भारतीय संविधानात लोकशाही विकेंद्रीकरणाच्या      तरतुदी ......... मध्ये दिलेल्या आहेत. 6  महिलांना पंचायत राज व्यवस्थेत सक्रिय                 सहभाग घेता यावा म्हणून 33 टक्के आरक्षण           ....

Std. - X English The Boy Who Broke The Bank (Comprehensive Reading Skill)

Read the passage carefully and do the following activities. A1. Write whether the following                            statements are true or false.    i.   Pipalnagar Bank had enough cash          for the withdrawal by the customers.    ii.  The bank supplied emergency funds          to another bank on some thirty                    miles distance.   iii.   Mischief makers joining the crowd          in front of the bank, hadn't their          accounts in the bank.   iv.    The aggravated crowd turned down           the Manager's urge to return to the           bank the next day.  A2.  Why was the bank Manager in a      ...