महाराष्ट्र समाज सेवा संघ संचालित नवरचना माध्यमिक विद्यालयातील विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक श्री नंदकिशोर काशिनाथ राणे हे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहेत.
श्री राणे सरांचा जन्म दिघावे या साक्री तालुक्यातील गावी झाला. वडिलोपार्जित शेती व्यवसाय असल्याने त्यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण दिघावे येथे झाले.
दहावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी सटाणा येथून पूर्ण केले विज्ञान शाखेतील रसायनशास्त्राची पदवी प्राप्त करून त्यांनी सुरुवातीला खाजगी कंपनी मध्ये नोकरी केली 1990 91 मध्ये ते रचना विद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून रुजू झाले.
उदरनिर्वाहासाठी नोकरी करताना उर्वरित वेळेचा सदुपयोग करून त्यांनी स्वाध्याय कार्यासाठी आपला वेळ दिला. पूजनीय दादांचे विचार स्वतः जीवनात अंगीकारणे आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला दादांच्या विचारांनी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला आजही ते हे कार्य करीत आहेत.
सेवाकाळात वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, प्रयोगांसाठी ची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, सुंदर हस्ताक्षर, आखीव-रेखीव काम आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध हे त्यांचे गुणविशेष सर्वांनाच भावणारे ठरले आहेत.
रचना माध्यमिक विद्यालयात 15 वर्षे तर नवरचना माध्यमिक विद्यालयात साडेचौदा वर्षे अशी प्रदीर्घ सेवा त्यांनी बजावली. शून्यातून पुढे येताना मोठा मित्रपरिवार जपला.
त्यांच्या सहचारिणी सौ साधनाताई या डे केअर सेंटर या इंदिरानगर येथील शाळेत उपशिक्षिका आहेत. मुलगा रोहित अभियंता तर कन्या दिव्या इंटेरिअर डिझायनर आहेत. त्यांचे जावई श्री मयूर कोठावदे हे रचना विद्यालयाचे माजी विद्यार्थी असून सध्या ते बेंगळुरू येथे संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
श्री राणे सर शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त झाले असले तरी स्वाध्याय कार्यासाठी अधिक वेळ देण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
निवृत्तीनंतरही शाळेच्या गरजेनुसार शाळेसाठी आपला वेळ देण्याचे आश्वासन त्यांनी संस्थेला दिले आहे.
श्री राणे सरांना भावी यशस्वी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Comments
Post a Comment