प्र 1 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1) कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश लिहा.
2) CSIR ने कोणकोणत्या क्षेत्रात संशोधन केले?
3) CSIR ने औद्योगिक संस्थान बरोबर करार का केले?
4) भारतातील गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला चालना देणारी संस्था कोणती?
5) स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे परम 8000 महासंगणक तयार करण्यात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
6) सी-डॅक संस्थेची स्थापना का करण्यात आली होती?
7) भारतीय तंत्र विज्ञान संस्थान (आयआयटी) ची स्थापना भारतात प्रथम कोठे करण्यात आली होती?
8) भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (BARC) या संस्थेने विज्ञानातील कोणत्या शाखांमध्ये संशोधन केले आहे?
9) आय आय एम अहमदाबाद ची स्थापना कोणी व का केली?
10) आकाशवाणी ट्रान्झिस्टर संच आणि गणकयंत्र यांचे आरेखन कोणत्या संस्थेने केले आहे?
11) इंडियन एअरलाईन्स आणि भारतीय स्टेट बँक या संस्थांची बोधचिन्ह कोणत्या संस्थेने तयार केलेली आहेत?
12) कोणत्या संस्थेच्या संशोधनामुळे भारतात हे रोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले?
13) वैद्यकीय शिक्षण गुणवत्ता निकष निश्चिती व देखरेख करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर सोपविण्यात आलेली आहे?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment