प्र 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून विधाने पूर्ण करा.
1) संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव ......अधिवेशनात संमत झाला.
अ) कोलकाता
☑️ब) लाहोर
क) अलाहाबाद
2) दांडी येथे मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी
साबरमती ते दांडी हे सुमारे........किमी अंतर पदयात्रेने पूर्ण केले.
अ) 285
☑️ब) 385
क) 485
3) दांडी येथील समुद्रकिनाऱ्यावर मिठाचा कायदा मोडून गांधीजींनी देशभर........चळवळ सुरू केली.
अ) असहकार
ब) छोडो भारत
☑️क) सविनय कायदेभंग
4) वायव्य सरहद्द प्रांतात 'खुदा-इ-खिदमदगार' संघटनेची स्थापना.........यांनी केली.
अ) मौलाना अबुल कलाम आझाद
ब) बॅरिस्टर जीना
☑️क) खान अब्दुल गफारखान
5) गढवाल पलटणीचे अधिकारी ........ यांनी पेशावर मध्ये सत्याग्रहयांवर गोळीबार करण्यास नकार दिला.
अ) कॅ रावत
ब) मेजर चंद्रसेन ठाकूर
☑️क) चंद्रसिंग ठाकूर
6) सविनय कायदेभंगामुळे गांधीजींना अटक केल्याने त्याचा निषेध म्हणून.........येथे गिरणी कामगारांनी सत्याग्रह सुरू केला.
अ) अहमदाबाद
☑️ ब) सोलापूर
क) मुंबई
7) सोलापूर गिरणी कामगार आंदोलनातील मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि .....
यांना फाशी देण्यात आले.
अ) राजगुरू
ब) शिरीषकुमार
☑️क) जगन्नाथ शिंदे
8) गुजरात मधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व .........यांनी केले.
अ) लीलावती मुन्शी
ब) कामालादेवी चटोपाध्याय
☑️क) सरोजिनी नायडू
9) सविनय कायदेभंग काळात महाराष्ट्रात........ येथे जंगल सत्याग्रह झाले.
अ) इगतपुरी
ब) बागलाण
☑️क) संगमनेर
10) मुंबईतील गिरणी कामगार......... यांनी विदेशी मालाच्या ट्रक समोर आडवे पडून हौतात्म्य दिले.
☑️अ) बाबू गेनू सैद
ब) कुर्बान हुसेन
क) मल्लाप्पा धनशेट्टी
11) भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान......... यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते.
अ) विन्स्टन चर्चिल
ब) माऊंटबॅटन
☑️क) रॅम्से मॅकडोनाल्ड
12) पहिली गोलमेज परिषद ..........च्या सहभागाअभावी असफल ठरली.
अ) संस्थानांचे प्रतिनिधी
ब) अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी
☑️क) राष्ट्रीय सभे
13) राष्ट्रीय सभेने ..........करारातील समझोत्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली होती.
☑️अ) गांधी-आयर्विन
ब) नेहरू- आयर्विन
क) गांधी-रॅम्से मॅकडोनाल्ड
14) दुसऱ्या गोलमेज परिषदेस राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून .....…. उपस्थित राहिले.
अ) डॉ बाबासाहेब आंबेडकर
☑️ ब) महात्मा गांधी
क) जवाहरलाल नेहरू
15) गोलमेज परिषदांमध्ये .......... यांनी दलितांचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
अ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
ब) महात्मा ज्योतीराव फुले
☑️क) डॉ बाबासाहेब आंबेडकर
16) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला जातीय निवाडा टाळून राष्ट्रीय ऐक्य जपण्यासाठी ........... यांच्यामध्ये पुणे करार झाला होता.
☑️अ) डॉ आंबेडकर - गांधी
ब) डॉ आंबेडकर - नेहरू
क) डॉ आंबेडकर - आयर्विन
17) 1942 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन.......येथे भरले होते.
अ) वर्धा
ब) नागपूर
☑️क) मुंबई
18) 1942 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद....... यांनी भूषविले.
अ) जवाहरलाल नेहरू
ब) महात्मा गांधी
☑️क) मौलाना अबुल कलाम आझाद
19) वैयक्तिक सत्याग्रहातील .......हे पहिले सत्याग्रही होते.
अ) जयप्रकाश नारायण
ब) यशवंतराव चव्हाण
☑️क) विनोबा भावे
20) भूमिगत चळवळीचे नेतृत्व ........यांनी केले होते.
☑️अ) जयप्रकाश नारायण
ब) मौलाना आझाद
क) शिरीषकुमार
21) छोडो भारत आंदोलनाच्या काळात रायगड जिल्ह्यात कर्जत मध्ये .........यांनी आझाद दस्ता स्थापन केला होता.
अ) उषा मेहता
ब) विठ्ठल जव्हेरी
☑️क) भाई कोतवाल
22) जपानमध्ये .........यांनी इंडियन इंडिपेंडेन्स लीग स्थापन केली होती.
☑️अ) रासबिहारी बोस
ब) सुभाषचंद्र बोस
क) चंद्रशेखर आझाद
23) आझाद हिंद सेनेचे नेतृत्व ........ यांनी केले होते.
अ) चंद्रशेखर आझाद
ब) रासबिहारी बोस
☑️क) सुभाषचंद्र बोस
24) आझाद हिंद सेनेने निकोबार बेट जिंकून त्यास .... हे नांव दिले.
अ) शहिद
ब) गांधीतीर्थ
☑️क) स्वराज्य
25) मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी पुकारलेले बंड ............ यांच्या मध्यस्थीने स्थगित केले.
☑️अ) सरदार वल्लभभाई पटेल
ब) जवाहरलाल नेहरु
क) महात्मा गांधी
26) महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक........... यांचा एडन च्या कारागृहात मृत्यू झाला.
अ) स्वा सावरकर
ब) बाळकृष्ण चाफेकर
☑️क) वासुदेव बळवंत फडके
27) स्वा सावरकर यांनी 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेचे ........... या सशस्त्र गुप्त क्रांतिकारी संघटनेत रूपांतर केले.
☑️अ) अभिनव भारत
ब) अनुशीलन समिती
क) गदर
28) जोसेफ मॅझिनी या इटालियन क्रांतिकारकांचे स्फूर्तिदायी चरित्र........ यांनी लिहिले होते.
अ) बाबाराव सावरकर
☑️ब) विनायकराव सावरकर
क) हुतात्मा अनंत कान्हेरे
29) स्वा सावरकर यांनी अंदमानच्या सेल्युलर जेल मधील वेदनादायी अनुभव.......... या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहेत.
अ) सातवे सोनेरी पान
ब) काळे पाणी
☑️क) माझी जन्मठेप
30) अनुशीलन समिती ही .......... प्रांतातील क्रांतिकारी तरुणांची संघटना होती
अ) पंजाब
ब) उत्तरप्रदेश
☑️क) बंगाल
31) खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी ........... या न्यायाधीशास ठार करण्याची योजना आखली होती.
अ) चेम्सफोर्ड
☑️ब) किंग्जफोर्ड
क) मॉन्टेग्यु
32) कोलकात्याजवळ ............. येथे अनुशीलन समितीचे बॉम्ब बनविण्याचे केंद्र होते.
☑️अ) माणिकताळा
ब) काकोरी
क) हुगळी
33) इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस ची स्थापना........ केली होती.
अ) मादाम कामा
☑️ब) पं श्यामजी कृष्ण वर्मा
क) फिरोजशहा मेहता
34) क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी .......... या ब्रिटिश अधिकाऱ्यास ठार केले.
अ) किंग्जफोर्ड
☑️ब) कर्झन वायली
क) लॉर्ड कर्झन
35) खालीलपैकी ........... हे गदर या क्रांतिकारी संघटनेचे सदस्य नव्हते.
अ) लाला हरदयाळ
☑️ब) लाला लजपतराय
क)डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे
Comments
Post a Comment