इयत्ता 8वी
विषय - इतिहास
प्रकरण -12वे
स्वातंत्र्यप्राप्ती
दुसरे महायुद्ध 1939 मध्ये सुरू झाले होते आणि ते 1945 मध्ये समाप्त झाले.
याच कालावधीत भारतीय स्वातंत्र्य लढा ऐन जोमात होता.
राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रीमंडळानी महात्माजींच्या सूचनेनुसार राजीनामे दिले होते.
भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढू लागला होता.
राष्ट्रीय सभेस व्यापक पाठिंबा समाजाच्या सर्व स्तरातून मिळत होता.
ब्रिटिश राज्यकर्त्यांना याची जाणीव झाल्याने त्यांनी वेगवेगळे प्रस्ताव राष्ट्रीय सभेसमोर ठेवण्यास सुरुवात केली.
स्वातंत्र्यासाठीच्या योजना भरातीयांसमोर मांडताना त्यांनी फोडा आणि राज्य करा या नितीचा अवलंब केला.
यामुळे स्वातंत्र्य दृष्टिपथात असताना देशाच्या विभाजनाची बीजे रुजविण्यात ब्रिटिश यशस्वी झाले.
ते कसे?
जून 1945 मध्ये भारताचे व्हॉईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना मांडली.
वेव्हेल योजना
या योजनेत खालील तरतुदी होत्या:-
1) केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्यात येईल.
2) व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील.
भारतातील राजकीय पक्षांच्या नेत्यांबरोबर विचार विनिमय करण्यासाठी वेव्हेेेल यानी सिमला येथे एक बैठक आयोजित केली होती.
सिमला बैठकीत मुस्लिम लीगचा आग्रह
व्हॉईसरॉय च्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचविण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा बॅ जीनांनी आग्रह धरला.
राष्ट्रीय सभेने यास विरोध केला.
त्यामुळे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही.
त्रिमंत्री योजना
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारतास स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले.
ब्रिटिश पंतप्रधान ऍटली (Atlee) यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्री पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, ए व्ही अलेक्झांडर यांचे शिष्टमंडळ भारतात वाटाघाटीसाठी पाठविले.
या शिष्टमंडळाने भारतीय नेत्यांसमोर योजना मांडली, त्यास त्रिमंत्री योजना असे म्हणतात.
अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत हे देखील अटलीनी स्पष्ट केले होते.
त्रिमंत्री योजनेचे अपयश
1) या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेस अमान्य
2) मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद नसल्याने मुस्लिम लीगचाही विरोध.
म्हणून त्रिमंत्री योजना फसली.
मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृतिदिन :
पाकिस्तान ची मागणी पूर्ण होत नाही हे लक्षात घेऊन मुस्लीम लीगने 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले.
यादरम्यान मुस्लीम लीगकडून हिंसक मार्गाचा अवलंब करण्यात आला.
परिणाम:
* देशात अनेक ठिकाणी जातीय दंगली झाल्या.
आपला जीव धोक्यात घालून बंगालमधील दंगलग्रस्त भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करीत होते.
हंगामी सरकारची स्थापना
मुस्लिम लीगने चिथावणी देऊन घडवून आणलेल्या दंगलींमुळे देशात एकीकडे हिंसाचाराचा आगडोंब तर दुसरीकडे व्हॉईसरॉय वेव्हेल कडून भारताच्या हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.
जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे हंगामी सरकारचे प्रमुख होते.
या सरकारच्या प्रारंभी मुस्लिम लीग सरकारबाहेर होती मात्र सरकारची अडवणूक करण्यासाठीच हंगामी सरकारमध्ये सामील झाली. मुस्लिम लीगच्या अडवणुकीच्या धोरणामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही.
माउंटबॅटन योजना
व्हॉईसरॉय वेव्हेल यांच्याजागी व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांची नियुक्ती
📌 माउंटबॅटन यांचा भारतातील प्रमुख नेत्यांबरोबर विचारविनिमय
📌 भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याची योजना तयार
📌 पाकिस्तानच्या हटवादी भूमिकेमुळे नाईलाजाने राष्ट्रीय सभेची फळणीस मान्यता
(वस्तूत: देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूलाधार होता.)
भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
पार्लमेंट (इंग्लंड) तरतुदी :-
📌 18 जुलै 1947 - भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर
📌 "15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे अस्तित्वात येतील;
📌 त्यानंतर इंग्लंडचा भारतावर कोणताही अधिकार राहणार नाही.
📌 भारतीय संस्थनांवारील ब्रिटिशांची सत्ता समाप्त होईल. त्यांना भारत वा पाकिस्तान पैकीं कोणत्याही देशात सामील होता येईल अथवा स्वतंत्र राहता येईल.
खालील विधाने वाचून त्याखाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) राष्ट्रीय सभेची उभारणी .........या तत्वावर झाली होती.
अ) सर्वधर्म समभाव
ब) सत्ताप्राप्ती
☑️क) धर्मनिरपेक्षता
2) स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचा विचार मांडणारी प्रथम व्यक्ती ..........
अ) मुहम्मद पैगंबर
☑️ब) मुहम्मद इकबाल
क) मुहंमद अली जीना
3) राष्ट्रीय सभेचे स्वातंत्र्य आंदोलन कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी ....नीतीचा अवलंब केला.
अ) राजकीय सुधारणावादी
ब) दडपशाही
☑️क) फोडा आणि राज्य करा
4) पाकिस्तानची कल्पना सर्वप्रथम ......... याने मांडली.
☑️अ) चौधरी रहमत
ब) मुहम्मद अली जीना
क) शाह आलम
5) द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी ............ ने केली.
☑️अ) मुहम्मद अली जीना
ब) फारुख अब्दुल्ला
क) गाझी खान
6) राष्ट्रीय सभा केवळ मुस्लिमांची संघटना असून मुसलमानांना तिच्यापासून काहीही फायदा होणार नाही असा अपप्रचार .......... ने केला.
अ) गाझी खान
ब) परवेझ मुशर्रफ
☑️क) मुहम्मद अली जीना
7) जून 1945 मध्ये भारतातील लोकांना वैधानिक सुविधा देण्यासाठी ............ यांनी एक योजना मांडली.
अ) लॉर्ड वेलस्ली
☑️ब) लॉर्ड वेव्हेल
क) लॉर्ड माऊंटबॅटन
8) वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी ...........येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची परिषद आयोजित करण्यात आली होती.
अ) श्रीनगर
☑️ब) सिमला
क) अमृतसर
9) दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताच्या स्वातंत्र्यसंदर्भात ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ............. या ब्रिटिश पंतप्रधानांनी धोरण स्पष्ट केले.
अ) विन्स्टन चर्चिल
☑️ब) क्लेमेन्ट अटली
क) लॉर्ड पॅथिक लॉरेन्स
10) 1946 च्या मार्चमध्ये ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारतीय नेत्यांसमोर मांडलेल्या योजनेस ............ योजना म्हणून संबोधले जाते.
☑️अ) त्रिमंत्री योजना
ब) पॅस्टॅण्डर योजना
क) वेव्हेल योजना
------------------------------------------------विद्यार्थीमित्रांनो
स्वातंत्र्यप्राप्ती या प्रकरणात आपण भारताची फाळणी याविषयी समजून घेतले.
पिढ्यानपिढ्या, शेकडो वर्षे हिंदू मुस्लीम समाज या देशात गुण्यागोविंदाने राहत होता परंतु ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे फुटीची विषारी बीजे रुजवून हा देश सोडला.
या फाळणीच्या काळात भारतातून पाकिस्तानात तसेच पाकिस्तानातून भारतात हजारो कुटुंबे स्थलांतरित झाली.
प्रचंड लूट, अत्याचार, खून,असा सामना त्यावेळी लोकांना करावा लागला.
पत्रकार तथा लेखक कुलदीप नायर हे अत्यंत आदराने घेतले जाणारे नांव.
Lokmat Times मध्ये ते नियमितपणे "Between The Lines" या स्तंभात लेखन करीत असत.
23 ऑगस्ट 2019 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते भारत - पाकिस्तान फाळणीचे प्रत्यक्ष साक्षीदार (first hand eyewitness) होते.
ज्या दिवशी त्यांचे निधन झाले त्याच दिवशी त्यांनी लिहिलेल्या लेखातून आपल्याला या फाळणीचे चटके ज्यांनी सोसले त्यांच्या वेदनांची कल्पना येईल.आपण हा लेख वाचावा अशी माझी विनंती.
Comments
Post a Comment