प्र 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा.
1 खालीलपैकी ........ हे लिखित साधन नाही.
(रोजनिशी, गॅझेट, उत्खननअवशेष,अभिलेख)
2 आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ......... चा
चौथा स्तंभ आहेत.
( समाजाचा, सरकारचा, लोकशाहीचा,देशाचा)
3 सद्यस्थितीत भारतातील सर्व वृत्तपत्रांना महत्वाच्या घटनांचे तपशील , लेख यासाठी
............. हा महत्वपूर्ण स्त्रोत आहे.
( यु एन आय, पी टी आय, ए पी आय, बी बी सी)
4 खालीलपैकी ......... हे भौतिक साधन नाही.
( पेहराव, राजमुद्रा, अलंकार, टपालतिकीट)
5 इंडियाज स्टॅम्प जर्नल चे संपादन .......... यांनी
केले होते.
(ऋषी कपूर, जतीन कुपर,
दास कपूर, जाल कुपर)
6 भारतीय रिझर्व्ह बँकेचे वस्तुसंग्रहालय ........
येथे आहे.
(दिल्ली, बेंगळुरू, पुणे, चंदीगड)
7 खालीलपैकी ......... हे दृक्श्राव्य साधन आहे.
(रेडिओ, टेपरेकॉर्डर, दै केसरी,
स्टार स्पोर्ट्स वृत्तवाहिनी)
8 फिल्म अँड टेलिव्हिजन इस्टिट्यूट ऑफ
इंडिया चे मुख्यालय ........... येथे आहे.
( अहमदाबाद, लखनौ, पाटणा, पुणे)
9 एफ टी आय आय ने देशासाठी योगदान देणाऱ्या
व्यक्ती आणि महत्वाच्या स्थळांचे ......... तयार
केले आहे.
(वृत्तपट, चित्रपट, अनुबोधपट, कृतिपट)
10 भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ........... येथे
आहे.
(कोलकाता, चेन्नई, नवी दिल्ली, पुणे)
11 इस 1962 चे भारत -चीन सीमा युद्ध ..........
क्षेत्रात झाले.
(लडाख, तिबेट, लेह, मॅकमोहन रेषा)
12 स्वातंत्र्यानंतर ........... यांना भारताच्या
परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणतात.
(इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री,
गुलझारीलाल नंदा, जवाहरलाल नेहरू)
13 लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक
निधन .......... येथे झाले.
(पॅरिस, मॉस्को, ताशकंद, लाहोर)
14 इ स 1966 मध्ये ........... यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
(सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, उषा मेहता)
15 इ स 1974 मध्ये भारताने पहिली अणूचाचणी
............. येथे यशस्वीरीत्या पूर्ण केली.
(जैसलमेर, बारमेढ, पोखरण, कच्छ)
16 इ स 1975 मध्ये ............. या राज्यातील जनतेने भारतात सामील होण्याच्या बाजूने
मतदान केले.
(सिक्कीम, मिझोरम, मेघालय, आसाम)
17 भारतात पहिली राष्ट्रीय आणीबाणी ............
यांनी घोषित केली होती.
(जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री,
इंदिरा गांधी, मोरारजी देसाई)
18 श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) या संघटनेने ........
यांची हत्या घडवून आणली.
(लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी,
राजीव गांधी, संजय गांधी)
19 1980 च्या दशकात अतिरेक्यांनी काश्मिरी
पंडितांना ............ या राज्यातून बाहेर
पडण्यास भाग पाडले.
(हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, हरयाणा)
20 इ स 1991 मध्ये .............. चे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्ध समाप्त झाले.
(युरोप, अमेरिका, सोव्हिएत युनियन,
रशिया)
21 इ स 1991 मध्ये .............. सरकारने
आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास
प्रारंभ केला.
(नेहरू, राजीव गांधी, नरसिंहराव, इंदिरा गांधी)
22 इ स 1991 नंतर झालेल्या आर्थिक बदलांना
............... म्हणून संबोधले जाते.
(वैश्विकरण, औद्योकीकरण, जागतिकीकरण ,
खासगीकरण)
23 भारतातील पहिल्या हरितक्रांतीचे जनक
म्हणून ............ यांना संबोधले जाते.
(डॉ एम एस स्वामिनाथन, डॉ शंकर दयाळ
शर्मा, डॉ वर्गीस कुरियन, डॉ राजेंद्र प्रसाद)
24 भारतात ............. प्रयोगामुळे पहिली
श्वेतक्रांती घडून आली.
(डॉ सुब्रमण्यम, डॉ अय्यर, डॉ वर्गीस कुरियन,
डॉ होमी भाभा)
25 इ स 1975 मध्ये इस्रो ने ............ हा पहिला
उपग्रह अवकाशात सोडला.
(पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, आर्यभट्ट)
26 73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने ...........
मध्ये स्त्रीयांसाठी राखीव जागा ठेवण्याची
तरतूद करण्यात आली.
(विधिमंडळ, संसद, राज्यसभा, स्थानिक
शासन संस्था)
27 ब्रिक्स (BRIKS) या आंतरराष्ट्रीय संघटनेत
खालीलपैकी .......... हा देश सदस्य नाही.
(भारत, ब्राझील, सिंगापूर, द आफ्रिका)
28 श्रीलंकेतील तामिळ अल्पसंख्याकांचे
प्रश्न सोडविण्यासाठी .......... यांनी
पुढाकार घेतला होता.
(इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी,
म. गांधी)
29 मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी ............. आयोग नेमण्यात
आला होता.
(कालेलकर आयोग, मंडल आयोग,
मुदलियार आयोग, स्वामिनाथन आयोग)
30 भारतात अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया ..........
यांनी रचला.
(डॉ होमी भाभा, डॉ कस्तुरीरंगन, डॉ माधवन नायर, डॉ ए पी जे अब्दुल कलाम)
__________________________________________
प्र 2 खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा.
1 भौतिक साधने - चर्च
लिखित साधने - गॅझेट
दृक साधने - चित्रपट
दृकश्राव्य साधने - दूरदर्शन
2 जवाहरलाल नेहरू - परराष्ट्र धोरण शिल्पकार
इंदिरा गांधी - ताशकंद करार
राजीव गांधी - एकसंघ श्रीलंका कल्पनेस पाठिंबा
लालबहादूर शास्त्री - भारताचे दुसरे पंतप्रधान
3 अकाली दल - पटनासाहिब ठराव
लाला जगतनारायण हत्या - भिंद्रनवाले
लाल डेंगा - मिझो नॅशनल फ्रंट
अरुणाचल प्रदेश - नेफा
4 राजनांदगाव - छत्तीसगड
कोरपूट - ओडिशा
विशाखापट्टणम - तेलंगणा
बालाघाट - मध्यप्रदेश
5 जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध बंड -
नक्षलवादी चळवळ प्रारंभ
धर्मांधता - धर्मनिरपेक्षतेचा पाया
आपल्या राज्यविषयी अवास्तव अभिमान -
प्रदेशवाद
ऑपरेशन ब्लू स्टार - खलिस्तानवादी अतिरेक्यांचे उच्चाटन
6 NEFA - आसामच्या उत्तरेकडील विभाग
NNC - मणिपूर
PLGA - सशस्त्र नक्षलवादी गट
MNF - मिझोरम
पुरूषोत्तम ठोके
नवरचना माध्य. विद्यालय, नाशिक-13
9822582419
__________________________________________
__________________________________________
Comments
Post a Comment