दिनांक - 20 डिसेंबर, 2020
प्र 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा.
1) सार्वजनिक समस्येबाबत जनमत तयार करून
सरकारवर दबाव आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या सामूहिक कृतींना .......... म्हणतात.
2) लोकशाही व्यवस्थेत शासनाच्या चुकीच्या किंवा अन्यायकारक धोरणांना विरोध करण्यासाठी ............... वापरला जातो.
3) स्वातंत्र्यपूर्व काळात ओडीशामधील ............
आदिवासींनी ब्रिटिश सरकारच्या अन्याय्य कायदयविरोधात चळवळ सुरू केली होती.
4) बिहारच्या ......... भागात नीळ उत्पादक शेतकऱ्यांनी ब्रिटीश सरकार विरुद्ध चळवळ सुरू केली होती.
5) भारत सरकारने ............... आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी
गेल्या काही दशकांपासून शेतकरी करीत आहेत.
प्र 2 सकारण स्पष्ट करा.
1) लोकशाहीमध्ये चळवळींना महत्व आहे.
2) भारतभर नव्याने कामगार प्रश्न निर्माण होत आहेत.
प्र 3 सविस्तर उत्तरे लिहा.
1) देशातील शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रमुख मागण्या आहेत?
2) डॉ राजेंद्रसिंह यांच्या पर्यावरण विषयक
कार्याची माहिती लिहा.
दिलेल्या चित्रातील संवाद वाचून परिच्छेद लिहा.
__________________________________________
Name :- Tanvi Somnath Nigal.
ReplyDeleteStd :- 10 th B .
प्र.१)
1) = चळवळ
2)=प्रतिकार करण्याचा हक्क (Right to protest).
3)= ओडिशातील गोंड आदिवासी.
4)=
5)=स्वामीनाथन.
प्र.२)
1) = सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी एक वा अनेक व्यक्ती संघटित होऊन सामूहिक आंदोलन उभे करतात.
सामाजिक प्रश्नांसंदर्भात सगळी माहिती आंदोलनातील कार्यकर्ते शासनाला देत असतात.
चळवळीच्या वाढत्या प्रभावामुळे शासनाला त्याची दखल घ्यावीच लागते.
शासनाच्या निर्णयांना ,धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी उभ्या राहतात.
लोकशाही पद्धतीतच जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो .म्हणून लोकशाही मध्ये चळवळींना फार महत्त्व असते.
2)= जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता ,कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे,अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता ,अनारोग्य इत्यादी मुळे भारतात नव्याने कामगारांचे प्रश्न उभे राहत आहे.
प्र.३)
1)= शेतमालाला योग्य भाव मिळावा , शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या देशातील शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.
2)= भारताचे जलपुरूष या नावाने ओळखले जाणारे डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थान मध्ये मोठी जलक्रांती घडवून आणली आहे.
राजस्थानमध्ये हजारो 'जोहड' ( नद्यांवरील मातीचे बंधारे) निर्माण करण्याच्या माध्यमातून ते प्रसिद्धीस आले होते.
सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नद्या पुनरूज्जीवित केल्या .
देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीवन संवर्धन, नद्या पुनरूज्जीवित करणे अशा मोहिमा राबवल्या .
डाॅ.राजेंद्रसिंह राणा यांनी देशभर ११ हजार जोहड बांधले.सतत ३१ वर्ष केलेल्या या जलक्रांती मुळे त्यांना भारतातील पाण्याचे बाबा आणि भारताचे जलपुरूष नावाने ओळखले जाते.
पाण्याचे नोबेल समजल्या जाणाऱ्या "स्टॉकहोम वॉटर प्राइझ "चे मानकरी आहेत.