दिनांक
17/01/2021
खालील प्रश्नांची सविस्तर आणि मुद्देसूद उत्तरे लिहा.
1) इ स 1972 च्या सुमारास वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सामूहिक स्त्री शक्तीचा आविष्कार कसा घडून आला?
2) इ स 1992 मध्ये तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारला दारूविक्री विरोधी कडक धोरण
का स्वीकारावे लागले?
3) संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला
विकासासंदर्भात कोणते निर्णय घेतले? संयुक्त राष्ट्रांच्या महिला धोरणास अनुसरून तत्कालीन भारत सारकरने कोणते प्रयत्न केले? f.
4) इ स 1975 ते 1985 या दशकात महाराष्ट्रासह भारतात महिला सबलीकरणासंदर्भात विविध परिषदा, उपक्रम, साहित्य निर्मिती आणि संघटन
याविषयी माहिती लिहा.
5) इ स 1952 च्या पोटगी कायद्यानुसार भारतीय हिंदू स्रियांना कोणते अधिकार प्राप्त झाले?
6) "73 व्या आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे भारतात खऱ्या अर्थाने महिला सबलीकरणास
चालना मिळाली." स्पष्ट करा.
7) स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय संविधानाने महिला सबलीकरणासंदर्भात कोणती महत्वपूर्ण
भूमिका बजावली आहे?
8) भारतातील आदिवासी जमातींना विशेष संरक्षण
देण्याची आवश्यकता का आहे?
9) भारतीय अणूऊर्जा आयोगाची उद्दिष्ट्ये स्पष्ट
करा.
10) भारतीय अणू ऊर्जा आयोगाने अणू ऊर्जा निर्मितीसाठी आणि विधायक वापरासाठी
कोणते प्रयत्न केले?
11) डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक म्हणून का
संबोधले जाते?
12) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या कार्याची
माहिती लिहा.
13) आधुनिक भारताच्या इतिहासातील भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचे महत्व खालील मुद्द्यांच्या
आधारे स्पष्ट करा.
अ) चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स
ब) वाराणसी लोकोमोटिव्ह
क) संगणकीकृत रेल्वे आरक्षण
ड) कोकण रेल्वे निर्मिती
14) भारतात पिनकोड (Post Index) व्यवस्था
केव्हा सुरू करण्यात आली?
15) भारतातील खालील उद्योगांबद्दल माहिती लिहा.
अ) वस्रोद्योग
ब) वाहन उद्योग
16) भारत सरकारने शेती व्यवसायास प्रोत्साहन
कोणकोणत्या योजना आखलेल्या आहेत?
17) संयुक्त राष्ट्रांची उद्दिष्ट्ये स्पष्ट करा.
18) संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे स्वरूप आणि
कार्ये लिहा.
19) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रचना आणि कार्ये लिहा.
20) संयुक्त राष्ट्रांच्या नव्या सहस्रकाची उद्दिष्ट्ये
स्पष्ट करा.
21) संयुक्त राष्ट्रांच्या जडणघडणीत भारताचे योगदान स्पष्ट करा.
22) भारताने अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत
लोकशाही सरकारच्या पुनरस्थापणेसाठी
कोणते भरीव प्रयत्न केले आहेत?
23) टीपा लिहा
अ) स्टॉकहोम पर्यावरण परिषद
ब) जगातील निर्वासितांसमोरील प्रश्न
24) सन 1969 च्या नंतरच्या दशकांमध्ये भारतात
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात कोणते महत्वपूर्ण बदल घडून आलेले आहेत?
25) भारतातील शहारांवरील ताण कमी करण्याचे
उपाय सुचवा.
26) सामूहिक ग्रामविकासाची चार उद्दिष्ट्ये लिहा.
27) ग्रामीण विकासासंदर्भातील आव्हाने स्पष्ट करा.
_________________________________
मुकतोत्तरी प्रश्न
(Open ended questions)
1) "विद्यमान स्थितीत देशात सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्रियांना संधी प्राप्त होते."वरील विधानासंदर्भात तुमचे अनुभव, वाचन आणि निरीक्षणाच्या आधारे तुमचे विचार व्यक्त करा.
2) शासकीय धोरणाद्वारे मद्यनिर्मितीस (वाईन इंडस्ट्रीस) दिले जाणारे प्रोत्साहन आणि
प्रत्यक्षात दारूबंदीची आवश्यकता या विरोधाभाससंदर्भात तुमचे वैयक्तिक विचार स्पष्ट करा.
3) संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (लोकसभेत) 543 पैकी राष्ट्रीय लोकसंख्येतील महिलांची टक्केवारी
(Female Population Percentage) विचारात घेता न्याय्य दृष्टीने महिला लोकप्रतिनिधींसाठी
किती आरक्षण असायला हवे असे तुम्हाला वाटते?
मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांसाठी लोकसभेत योग्य आरक्षण का दिले जात नाही?
4) केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी
केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशात
संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना विशिष्ट
राज्यांमधील शेतकऱ्यांनी 50 दिवसांहून
अधिक काळ सुरू केलेले आंदोलन यासंदर्भात
तुमचे विचार स्पष्ट करा.
5) चीनने पाकव्याप्त काश्मीर मधून कोणता कॉरिडॉर उभारला आहे? त्यामुळे भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला कोणता धोका निर्माण झाला
असे तुम्हाला वाटते?
6) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सभासदांना कोणता विशेषाधिकार प्राप्त झालेला आहे?
त्यामुळे कोणते दुष्परिणाम जगासमोर उद्भल्याचे
तुम्हाला जाणवते?
7) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या रचनेत कोणते बदल तुम्ही सुचवाल?
8) तंत्रज्ञान वापरासंदर्भात भारतीय रेल्वेने विविध
किर्तीमान स्थापित केले असताना अलीकडे रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर खासगीकरण का सुरू करण्यात आले आहे?
9) तुमच्या मते भारताने पाकिस्तान, नेपाळ आणि म्यानमार या देशांशी परराष्ट्र संबंधांसंदर्भात कोणत्या मुद्द्यांचा विचार करायला हवा?
10) सद्यस्थितीत भारताच्या सार्वभौमत्वाला
सर्वाधिक धोका कोणत्या देशाकडून निर्माण
झाला आहे?
यासंदर्भात भारतीयांनी काय करायला हवे असे
तुम्हास वाटते?
____________________________
- पुरुषोत्तम ठोके
9822582419
____________________________
Sir he vahit sodvaych ahe ka fullscepe vr
ReplyDelete